भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज

krupalu mhanoni bolati puranen | nirdhar vachanen yanchin maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥ आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥ नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥२॥ कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥ तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल भूक या डोळियांची ॥४॥