भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोटीची भरोवरी सरोनी गेली शरीरीं

kotichi bharovari saroni geli sharirin

कोटीची भरोवरी सरोनी गेली शरीरीं । संसाराचि उरी कांही नुरेचिगे माये ॥१॥ लक्षाचा लाभ मज घडलागे माय । कवणें उपायें चरण जोडले वो ॥२॥ चिंतनीं चिंतिता काय चिंतावें । तें अवघेंचि मनीं रुप गिळावेंगे माये ॥३॥ बापरखुमादेविवरु देहेंवीण आलंगिला । तो समर्थ माल्हाथिला बाईये वो ॥४॥