भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं

koradiya aisha kay saru goshti | kara uthauthin hit adhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥१॥ खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥ लौकिकाचा आड येईल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥२॥ तुका म्हणे डांक लागे अळंकारें । मग नव्हे खरें पुटेविण ॥३॥