भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया

konya kalen yeil mana | narayana tumachiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥ माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥ लागलीये तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥ मुखाची च पाहें वास । मागें दास सांभाळीं ॥३॥ इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥४॥ लाहो काया मनें वाचा । दिवसाच्या भेटीचा ॥५॥ कंटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासांचा ॥६॥ तुका म्हणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥७॥