भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता

koni suna koni lenki | koni eki satanta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥ अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥ अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥ तुका म्हणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥३॥