भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें

konaten karan rahilen yamulen | jen myan tuj balen kashtavaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥ नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥ नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या ह्मैसी गाई व्हाव्या ॥२॥ हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥३॥ तुका म्हणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥४॥