भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण येतें घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा

kon yeten ghara amuchya kashala | kay jyacha tyala nahin dhanda

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण येतें घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥ देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥ मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥२॥ तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान लागे पाठीं ॥३॥