भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत

kon ya purusharthachi gati | aniyela hatohatin | jahaj pruthvipati | keli khyati adbhut

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥ भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वर्णिला । दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥ केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें । दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे किल्ल्या । संताचे हातीं दिल्या । आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥