भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश

kon sangayas | gelen hoten deshodesh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥१॥ जालें वार्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥ कोणाची हे सत्ता। जाली वाचा वदविता ॥२॥ तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥३॥