भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण माझा आतां करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण

kon majha atan karil parihar | tujavin dongar utari kon

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कोण माझा आतां करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥ तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥ बहु कनवळा तुझिया गा पोटीं । आतां नको तुटी करूं देवा ॥३॥ चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत । ठेवा माझें चित्त तुमचें पायीं ॥४॥