भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण भाग्य तया सेना न्हावियाचें

kon bhagya taya sena nhaviyachen

रचनाकार: संत बंका · अभंग
कोण भाग्य तया सेना न्हावियाचें । नीच काम त्याचे स्वयें करी ॥१॥ घेउनी धोकटी हजामत करी । आरसा दावी करी बादशहासी ॥२॥ कसबाचे घरी विकीतसे मांस । राका मेहत्यास हुंडी भरी ॥३॥ वंका म्हणे ज्याचे पुराणी पवाडे । तो भक्त सांकडे वारीतसे ॥४॥