भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठीं

kiti ya kalacha sosava valasa | lagala sarisa pathopathin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥१॥ लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥ उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवें चि तें ॥२॥ तुका म्हणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥