भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती वेळी खादला दगा । अझून कां जागसी ना

kiti veli khadala daga | ajhun kan jagasi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती वेळी खादला दगा । अझून कां जागसी ना ॥१॥ लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥ सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥२॥ तुका म्हणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥