भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ

kiti sositi karantin | nenon sansarachi ati | sarvakal potin | chintechi halahal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥ रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवा विषय माजिरा ॥ध्रु.॥ कळतां न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥ तुका म्हणे जन । ऐसें नांवबुद्धीहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक न मिळे ॥३॥