भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप

kirtan chang kirtan chang | hoy ang harirup

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप ॥१॥ प्रेमेछंदें नाचे डोले । हारपले देहभाव ॥ध्रु.॥ एकदेशीं जीवकळा। हा सकळां सोयरा ॥२॥ तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥३॥