भजनी मालिका
← भजनांकडे परत

खोल ओली पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय

khol oli pade ten pik uttam | uthalacha shram vanyan jay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खोल ओली पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥ लटिक्याचे आम्ही नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥ कोणा इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥२॥ तुका म्हणे कसीं अगी जें उतरे । तें चि येथें सरे जातिशुद्ध ॥३॥