भजनी मालिका
← भजनांकडे परत

खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राम्हण कलीयुगीं

khisticha udim udimant hin | kariti bramhan kaliyugin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राम्हण कलीयुगीं ॥१॥ वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥ मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरी थुंका पडतसे ॥२॥ आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥३॥ तुका म्हणे देह झालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥