भजनी मालिका
← भजनांकडे परत

खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी

kharen bhandaval sampadalen ganthi | jenen naye tuti udamasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥१॥ संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा घाव तैसा ॥२॥ फडा आलिया तो न वजे निरास । जरि कांहीं त्यास न कळतां ॥३॥ तुका म्हणे आतां झालीसे निश्चिंती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥४॥