भजनी मालिका
← भजनांकडे परत

खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी

khadalen cha khaven vate | bhetalen bhete avadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥१॥ वीट नाहीं पांडुरंगीं । वाटे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥ ह्रदयांची हांव पुरे । परि हें उरे चिंतन ॥२॥ तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥३॥