भजनी मालिका
← भजनांकडे परत

खडा रवाळी साकर । जाला नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायी निवडितां

khada ravali sakar | jala namachachi pher | na dise antar | godi thayi nivaditan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खडा रवाळी साकर । जाला नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायी निवडितां ॥१॥ तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसे काय सांगा । चालविले जागा । मी हे माझे यासाठी ॥ध्रु॥ पायी हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं । मुसे आल्यावरी । काय निवडे वेगळे ॥२॥ निजलिया लाभ हानी । तों च खरी ते स्वप्नीं । तुका म्हणे दोन्ही । निवारिलीं जागतां ॥३॥