भजनी मालिका
← भजनांकडे परत

केली सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळें धाकुटीं

keli salagi tondapiti | amhi ladivalen dhakutin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केली सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळें धाकुटीं ॥१॥ न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥ अवघ्यांमध्यें एक वेडें । तोचि खेळविती कोडें ॥२॥ तुका म्हणे मायबापा । मजवरी कोपों नका ॥३॥