भजनी मालिका
← भजनांकडे परत

केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये

keli pradnya manashin | tai mi dan satyatveshin | nein payampashin | svami mul pandhariye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥ तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥ ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥ घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता। तुका म्हणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥