भजनी मालिका
← भजनांकडे परत

केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण

kelen shakunen prayan | atan magen phire kon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥ होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥ पडिलें पालवीं । त्याचा धाक वाहे जीवीं ॥२॥ तुका म्हणे जीणें । देवा काय हीनपणें ॥३॥