भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध

kela ravanacha vadh | avagha todila sambandh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥ लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥ औदार्याची सीमा । काय वर्णु रघुरामा ॥२॥ तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥३॥