भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला पुढें हरी अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले

kela pudhen hari astamana disa | magen tyasarise that chale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केला पुढें हरी अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥ थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥ सोयी लागलिया देवाची आवर्ती । बोलवितां येती मागें तया ॥३॥ तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥४॥ सुख नाहीं कोणा हरीच्या वियोगें । तुका म्हणे जुगें घडी जाय ॥५॥