भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी

kela pan sandi | aisiyasi mhanati landi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी ॥१॥ आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥ आपला निवाड । आपणें चि करितां गोड ॥२॥ तुह्मीं आह्मीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥ आसे धुरे उणें । मागें सरे तुका म्हणे ॥४॥