भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना

kayavachamanen jala vishnudas | kam krodh tyas badhitana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥ विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥ तुका म्हणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥३॥