भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारांसी

kaya vacha manen shrimukhachi vas | anik udas vicharansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारांसी ॥१॥ काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥ केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पलटेना ॥२॥ तुका म्हणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥३॥