भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुम्ही जाणां । करूं अव्हेर नारायणा

kay tumhi janan | karun avher narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तुम्ही जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥१॥ तरी या लटिक्याची ग्वाही । निवडिली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥ कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥२॥ आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥३॥ आणीक कोणी भीती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥४॥ तुका म्हणे बीज पोटीं । फळ तैसें चि शेवटीं ॥५॥