भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन

kay tujhen veche maj bheti detan | vachan bolatan ek don

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥ काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥२॥ तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥