भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुझा महिमा वर्णु मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती

kay tujha mahima varnu mi kiti | namen matre bhavapash tutati | pahatan paule he vishnumurti | kotikulan sahit je uddharati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तुझा महिमा वर्णु मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥१॥ जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥ मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा । श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥ धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचें पूजन एकाभावेंसी। नित्यमुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥३॥ न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । अखंड तुझा वास तयांच्या चित्तीं । धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीर्थे मिळन वास तयांचा वाहाती ॥४॥ देव भक्ती तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ती हे जनीं । जड जीवां उद्धार होया लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥५॥