भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें

kay sarpa khato anna | kay dhyan bagachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥ अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ध्रु.॥ काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥२॥ तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥३॥