भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज

kay sangon tujhya charanichya sukha | anubhav thauka nahin tuj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥ आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥ तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥