भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा

kay punya aisen ahe majapashin | tantadi dhanvasi panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥ काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥ काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥२॥ कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥ तुका म्हणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥४॥