भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया

kay mi anyayi ten ghala palavin | anik vat davin chalavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥१॥ माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोणी सांगा ॥ध्रु.॥ धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥२॥ वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुम्हां एक सांगतों मी ॥३॥ तुका म्हणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त जाला मान पावे ॥४॥