भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं

kay majhi sant pahati janiv | sarva majha bhavatyanche payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥१॥ कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥ बोबडा उत्तरीं म्हणें हरीहरी । आणीक भीकारी नेणें दुजें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास । करितों मी आस उच्छिष्टाची ॥३॥