भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । नेऊं पतना आदरिलें

kay kay kariton ya mana | pari naike narayana | karun naye tyachi kari vivanchana | neun patana adarilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । नेऊं पतना आदरिलें ॥१॥ भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कटपट । घात बळकट मांडियेला ॥२॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥३॥ चेतवूनि इंद्रियें सकळ। आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥४॥ आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥५॥