भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो

kay kashi kariti ganga | bhitarin changa nahin to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥ अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥ तुका म्हणे प्रेमें विण । अवघा शीण बोले भुंके ॥३॥