भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं सांगतांही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो

kay karun sangatanhi na kale varma | upisthat bhram upajavito

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं सांगतांही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥१॥ मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥ अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥ तुका म्हणे आप राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥३॥