भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म

kay karun karmakarma | baren sampadalen varma

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥ होसी नामा च सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥ तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हां ओझें ॥३॥