भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा

kay karun ji datara | kanhin na pure sansara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥१॥ जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥ घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥२॥ आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥३॥