भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना

kay karun atan ya mana | na sandi vishayanchi vasana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना । प्रार्थितांही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥१॥ आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी । न दिसे कोणी आवरी । आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥ न राहे एके ठायीं एकी घडी । चित्त तडतडा तोडी । भरले विषय भोवडी । घालूं पाहे उडी भवडोहीं ॥२॥ आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं । तुका म्हणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी ॥३॥