भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ह्याचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें

kay hyachen ghyaven | nitya nitya konen gaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय ह्याचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥ केलें हरीकथेनें वाज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥ काम संसार । अंतरीं हे करकर ॥२॥ तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥३॥