भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय हें मातेसी बाळें शिकवावें । आपुल्या स्वभावें वोढतसे

kay hen matesi balen shikavaven | apulya svabhaven vodhatase

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
काय हें मातेसी बाळें शिकवावें । आपुल्या स्वभावें वोढतसे ॥१॥ तैसाच प्रकार तुमचीये घरीं । ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥ तेचि आजी दिसे वोखटें कां झालें । संचिताचें बळें दिसे ऐसें ॥३॥ चोखा म्हणे हा तो तुम्हां नाहीं बोल । आमुचें सखोल कर्म दिसे ॥४॥