भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय दिवस गेले अवघे चि वराडें । तें आलें सांकडें कथेमाजी

kay divas gele avaghe chi varaden | ten alen sankaden kathemaji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय दिवस गेले अवघे चि वराडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥ क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईल पुढें ॥ध्रु.॥ कथेचे विसर दोषामूळे होय । तरणोपाय कैचा मग ॥२॥ काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥३॥ ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शुद्ध रत्नें ॥४॥ तुका म्हणे हें चि बोलावया चाड । नाम घेता गोड हित असे ॥५॥