भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें

kay dhovilen baheri man malalen antarin | gadalen janmavarin asatyakaten katalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥ सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥ पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥ कामक्रोधा वेगळा ऐसा होई कां सोंवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥३॥