भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें

kay dhorapudhen ghaluni mishtanna | khara vilepan chandanachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥१॥ नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥ काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥ तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥३॥