भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय धर्म नीत । तुम्हां शिकवावें हित

kay dharma nit | tumhan shikavaven hit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय धर्म नीत । तुम्हां शिकवावें हित ॥१॥ अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥ध्रु.॥ नाम महादेव । येथें निवडला भाव ॥२॥ तुका म्हणे वेळे । माझें तुम्हां कां न कळे ॥३॥