भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी

kay deh ghalun karavati karamari | takun ya bhitari agnimaji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥ काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥ काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥२॥ काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥३॥ तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥४॥