भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा

kay bolon sanga | yaupari panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥ कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥ वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥२॥ भक्तीभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा ॥३॥ कोरड्या उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥४॥ करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥५॥